झपाटलेले घर - Marathi Ghost Kids Story - Marathi goshti

मराठी छान छान गोष्टी लहन मुलांसाठी व मोठ्यांसाठी 30 मजेदार गोष्टी मराठी मधे

December 28, 2019

झपाटलेले घर - Marathi Ghost Kids Story

 Marathi Ghost Kids Story


झपाटलेले घर


Amityville या अमेरिकेतील एका गावात घडलेली अतिशय भयानक आणि बहु चर्चित अशी सत्य भय कथा आहे. रोनाल्ड देफ़िओ नामक इसमाने त्याच्या राहत्या घरात त्याच्या आई वडिलांचा आणि चार मुलांचा खून केला. पोलिसांच्या तपासानुसार आलेल्या माहिती प्रमाणे रोनाल्ड ने वापरलेल्या बंदुकीला सायलेन्सर लावले नव्हते तसेच प्रतिकार झालेल्या कोणत्याच खुणा घरात आढळल्या नाहीत. तपास्कारांना हि मोठी बुचकळ्यात टाकणारी बाब होती.

१९७५ मध्ये लुत्झेस नावाचे एक परिवार त्या घरात राहण्यास आले. हा परिवार तेथे जास्तीत जास्त एक महिना राहिला. या एका महिन्यात त्यांना तिथे अमानवी आणि भयानक अशा गोष्टींचा अनुभव आला.

घरामध्ये अनेक प्रकाचे भयानक आवाज येत असत खासकरून रात्रीच्या वेळेस. त्या परिवारातल्या लहान मुलीला एक लहान मुलगी दिसायची जिच्या सोबत तिने मैत्री केली होती. तिचे डोळे लालभडक होते. भिंतीवर आदळ आपट होत असे आणि घरातील फर्निचर सुधा जागेवरून हलत असे.

अलौकिक तपासकार एड आणि लॉरेने वॉरेन चौकशी करण्यासाठी बोलाविले गेले होते. त्यांच्या तपासानुसार घर पछाडले होते. असे ऐकिवात आहे कि नवीन राहण्यास आलेल्या परिवारातील मुख्य पुरुषाला पछाडले गेले होते आणि त्याने सुधा आपल्या मुलांवर जीवघेणा हल्ला केला होता. पण आई मुळे ती मुले बचावली.


 Marathi Ghost Kids Story

No comments:

Post a Comment

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();