डॉक्टर राजेश आणि म्हातारा - Ghost Story In Marathi - Marathi goshti

मराठी छान छान गोष्टी लहन मुलांसाठी व मोठ्यांसाठी 30 मजेदार गोष्टी मराठी मधे

December 29, 2019

डॉक्टर राजेश आणि म्हातारा - Ghost Story In Marathi

Marathi Goshti For Kids Story in Marathi Ghost Story

Ghost Story In Marathi


डॉक्टर राजेश आणि म्हातारा


"डॉक्टर राजेश ची कोकणात बदली होऊन दोन तीन दिवस झाले होते. कोकणातल्या सरकारी दवाखान्यात त्याची क्लास वन सर्जन म्हणून नेमणूक झाली होती. राहायला सरकारी घर मिळाले होते. पण ते बाजार पेठेपासून दूर दोन तीन किलोमीटरच्या अंतरावर होते. रस्त्यात अधे मध्ये इतर हि घर आणि वस्ती होती पण फारच तुरळक.

एके दिवशी राजेशला दवाखान्यात इमर्जन्सी केस आली होती त्यामुळे त्याला निघायला खूप उशीर झाला. जवळ मोटार सायकल होती. ती घेऊन तो घराच्या रस्त्याला लागला. दवाखाना आणि घर अशे जवळपास पाच ते सहा किलोमीटर चे अंतर होते.

राजेश मोटार सायकल घेऊन निघाला आणि त्या निर्जन रस्त्यावर आला. आजूबाजूला किर्रर्र वातावरण आणि भयाण काळोख पसरला होता. मोटार सायकलच्या हेडलाईट च्या प्रकाशात राजेश हळू हळू चालला होता. अचानक रस्त्याच्या डाव्या बाजूने काहीतरी सरपटत त्याच्या मोटार सायकल समोरून उजवीकडे निघून गेले तसा राजेश चा तोल ढासळला आणि तो खाली पडला. त्याने चपापून इकडे तिकडे नजर फिरवली. काय होते ते कि आपल्याला भास झाला. उठून त्याने मोटार सायकल सरळ केली आणि सुरु करू लागला पण मोटार सायकल चालूच होईना.

राजेश ला दरदरून घाम फुटला होता. आता काय करावे.आजूबाजूला कोणीच नव्हते. मदत मागण्यासाठी ना कोणी मनुष्य होता नाही आजूबाजूला एखाद घर. काय करावे असा विचार चालू असतानाच मागून एक थंडगार हात राजेश च्या खांद्यावर पडला. हृदय गोठणे हि काय अवस्था असते ते राजेशने पुरेपूर त्याक्षणी अनुभवले. हळूच त्याने मागे वळून पहिले.

एक साठीचा इसम त्याच्यासमोर उभा होता. उंचपुरा मजबूत शरीरयष्टी आणि तितकेच राकट डोळे.

“माझी बायको खूप आजारी आहे. मला मदत करा”
“कोण तुम्ही आणि कुठे राहता”, राजेश ने चाचरत विचारले.
“मी रंगा वेताळे”, तितकेच थंड उत्तर. “डॉक्टर माझ्या बायकोला खूप ताप भरलाय. डॉक्टर ची खूप गरज आहे. तुम्ही माझ्यासोबत आलात आणि तिला तपासालात तर...”
“हो नक्कीच, चला”, मुळचा मदत करण्याचा स्वभाव असलेला राजेश आढेवेढे न घेता लगेच तयार झाला.

चला म्हणून तो इसम रस्त्याच्या डाव्या बाजूच्या पायवाटेने पुढे चालू लागला. राजेशने गाडीची चावी काढून घेतली आणि त्याच्या मागून चालू लागला. वाटेत त्याने काही जुजबी प्रश्न केले पण काही प्रतिसाद मिळाला नाही. तो इसम भराभर पुढे चालत होता. पायवाट आता संपली होती पुढे घनदाट झाडी दिसत होती. राजेश च्या मनात अचानक भीतीची एक लहर उसळली. हि वाट तर जंगलात जाते...

अचानक राजेशच्या पायाजवळून काहीतर सरपटत पुढे निघून गेले ते थेट त्या इसमाच्या पायाला भिडले. इतका वेळ राजेशच्या हा प्रकार लक्षात आला नव्हता, त्या इसमाचे पाय शरीराच्या विरुद्ध दिशेला वळले होते आणि तो थेट पुढे चालत होता. राजेशने डोळे विस्फारले भीतीने त्याच्या मानेवरचे केस ताठ झाले. गर्भगळीत होऊन तो तेथेच उभा राहिला आणि तो इसम पुढे चालत चालत एका झाडीमागे गुडूप झाला.

राजेश धडपडत पळत त्याच्या मोटार सायकल जवळ आला. थरथरत्या हातांनी त्याने चावी लावली. दोन तीन झटक्यात मोटार सायकल सुरु झाली. आणि तितक्यात डावीकडून आवाज आला “आज वाचलास...” आणि भयंकर शांतता पसरली.
(डॉक्टर राजेशला आणखी इतर विचित्र अनुभव त्या गावात आले. ते लवकरच प्रकाशित केले जातील)




Marathi Goshti For Kids Story in Marathi Ghost Story

No comments:

Post a Comment

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();