दोन मित्र आणि अस्वल - Don Mitra Ani Aswal - Marathi goshti

मराठी छान छान गोष्टी लहन मुलांसाठी व मोठ्यांसाठी 30 मजेदार गोष्टी मराठी मधे

November 16, 2021

दोन मित्र आणि अस्वल - Don Mitra Ani Aswal

दोन मित्र आणि अस्वल - Don Mitra Ani Aswal Marathi Panchatantra Story Moral For Kids

 

दोन मित्र आणि अस्वल - Don Mitra Ani Aswal Marathi Panchatantra Story Moral For Kids

 


एका गावात राम व श्याम नावाचे दोन जिवलग मित्र रहात होते. राम हा शरीराने बारीक व श्याम हा थोडा जाड होता. एकदा ते दोघे दुसऱ्या गावात जायला निघाले. त्यांनी आपसात असे ठरविले की, ‘प्रवासात जर एखादयावर काही संकट आले तर दुसऱ्याने त्याला मदत करावी.’
वाटेत पुढे जाताना त्यांना एक अरण्य लागते. तेव्हा त्यांच्यासमोर एक अस्वल येते व ते त्यांच्या अंगावर धावून येते. त्या दोन मित्रापैंकी राम हा बारीक व चपळ असल्यामुळे जवळ असलेल्या झाडावर चढून बसतो. पण श्याम हा जाड असल्यामुळे त्याला पळणे शक्य नव्हते व झाडावर पण त्याला चढता येत नव्हते, तेव्हा तो आपला श्वास कोंडून मेल्याचे सोंग घेऊन जमीनीवर पडतो. अस्वल त्याच्या जवळ येऊन त्याच्या कानाजवळ हुंगून बघतो आणि हे प्रेत आहे असे समजून त्याला काहीही उपद्रव न करता तो निघून जातो.
अस्वल गेल्यावर झाडावर चढलेला राम खाली उतरून आपल्या सोबतच्या मित्राला विचारतो ‘श्याम, त्या अस्वलाने तुझ्या कानात काय सांगितले?’ श्याम उत्तरला ‘अस्वलाने मला सांगितले की, तुझ्यासारख्या लबाड मित्राच्या शब्दावर पुन्हा विश्वास ठेवू नकोस.’
तात्पर्य - खरा मित्र तोच जो संकटात धावून येतो.

No comments:

Post a Comment

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();