हत्ती आणि ससा - Hatti Ani Sasa Marathi Goshti For Read - Marathi goshti

मराठी छान छान गोष्टी लहन मुलांसाठी व मोठ्यांसाठी 30 मजेदार गोष्टी मराठी मधे

July 15, 2021

हत्ती आणि ससा - Hatti Ani Sasa Marathi Goshti For Read

हत्ती आणि ससा - Hatti Ani Sasa Marathi Goshti For Read

हत्ती आणि ससा - Hatti Ani Sasa Marathi Goshti For Read


कडक उन्हाळ्याचे दिवस होते. जंगलातील तळ्याचे पाणी संपत चालले होते. तळ्यातील पाणीही आटले. हत्तीचा कळप पाण्याच्या शोधात होता . पाणी कोठेच मिळत नव्हते.

हत्तीच्या कळपाचा राजा म्हणाला, मला दुसऱ्या जंगलातील सर्वात मोठे तळे माहित आहे आपण तिकडे जाऊयात. हत्तींना पिण्यासाठी पाणी हवेच होते. सगळे दुसऱ्या जंगलाकडे निघाले. तीन रात्री प्रवास केल्यानंतर हत्तीचा कळप त्या सर्वात मोठ्या तळ्याजवळ आले.

त्या सर्वात मोठ्या तळ्याच्या परिसरात ससे निवास करीत होते. तळ्याच्या आसपास मातीत बिळे करून ते राहत होते. तीन रात्री चा प्रवास करून आलेल्या हत्तींना पाणी बघतच पाण्याच्या दिशेने धाव घेतली. आपल्यामुळे सशांची घरे नष्ट होत आहे हे त्यांच्या लक्षातच आले नाही. हत्तीच्या पहिल्या फेरीत खूप ससे मारले गेले रोजच हत्ती पाणी पायायला येऊ लागले आणि सशांची हानी होवू लागली.

सशांना या परिस्थितीवर उपाय शोधणे भाग होते. सशांच्या कळपातील एक हुशार ससा हत्तींच्या राजाला भेटायला गेला. ससा म्हणला , ' महाराज आमचे थोर राजे चंद्रमहाराज यांनी आपणास तळ्यातील पाणी पिण्यास मनाई केली आहे. तेव्हा हत्तींच्या कळपाच्या राजाने त्याला विचारले कोठे आहे तुमचा राजा तेव्हा ससा म्हणाला, 'चला मी तुम्हाला त्यांच्या कडे घेऊन जातो' .

सशाने लांबच्या रस्त्याने हत्तीला तळ्यापर्यंत नेले. ते पोहोचेपर्यंत चंद्र आकाशात आला. तळ्यात चंद्राचे प्रतिबिंब पडले होते. त्याकडे बोट दाखवून ससा म्हणाला, " ते बघा आमचे महाराज रागाने थरथरत आहेत."

हत्ती हे दृश्य पाहून घाबरला. पाण्यात हलणारे प्रतिबिंब पाहून हत्तीने सशाची क्षमा मागितली. सर्व हत्तींना घेऊन त्यांचा राजा जंगलाबाहेर पडला ससे आता आनंदाने तळ्याभोवती राहू लागले.

तात्पर्य - शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ

No comments:

Post a Comment

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();