लोभी बगळा आणि हुशार खेकडा - Marathi New Stories - Marathi goshti

मराठी छान छान गोष्टी लहन मुलांसाठी व मोठ्यांसाठी 30 मजेदार गोष्टी मराठी मधे

May 14, 2021

लोभी बगळा आणि हुशार खेकडा - Marathi New Stories

लोभी बगळा आणि हुशार खेकडा - Marathi New Stories 

लोभी बगळा आणि हुशार खेकडा - Marathi New Stories


एका जंगलात एक तळे होते. त्यात एक म्हातारा बगळा रहात होता. म्हातारपणामुळे तळ्यातील मासे पकडण्याची शक्ती सुद्धा नव्हती.

एके दिवशी भुकेने व्याकूळ झाल्याने तो बगळा त्या तळ्याकाठी रडत बसला होता. त्याचे रडणे ऐकून जवळच राहणारा खेकडा त्या बगळ्याची विचारपूस करण्यास आला, ''बगळेकाका, आज आपण इथं रडत बसलात तेव्हा आपल्या जेवणाची काही सोय नाही का?''

बगळ्याने सांगितले, ''बाळ, तुला काय सांगणार! मी आजपासून हिंसा करायची नाही असं ठरवलंय. उपासमारीने जीव गेला तरी चालेल... पण मी निश्चय सोडणार नाही. माझ्या अंगी आता एकदम वैराग्य आलंय! माझ्या आसपास इतके मासे हिंडताहेत पण मी ढुंकूनसुद्धा बघत नाही!''

खेकडा विचारतो, ''पण काका, हे वैराग्य अचानक कसं आलं? त्यामागे काही कारण घडलं कां?''

त्याबरोबर बगळा धूर्तपणे उत्तर देतो, ''बाळा! या तळ्यातच माझ्या जन्मापासून आजपर्यंत मी आयुष्य काढले. एका ज्योतिषाने मला भविष्य सांगतिल्याने मी दु:खी आहे!''खेकडा विचारतो, ''कसलं भविष्य?''

''अरे, आता बारा वर्षे पाऊस न पडून या तळ्यातले पाणी पूर्ण आटून जाणार. हे भविष्य ऐकल्यावर मी अतिशय दु:खी झालो आहे. '' बगळा डोळे पुसत बोलत होता, ''आता या तळ्यातले पाणी हळूहळू आटते आहे. ज्यांच्याबरोबर आज इतकी वर्षे आंनदात काढली ते आता नाश पावणार. छे! ही कल्पनाच मी सहन करू शकत नाही!'' खेकडा घाबरून विचारतो, ''बगळेकाका, यावर उपाय नाही का?''

बगळा विचार करून सांगतो, ''आहे! एक उपाय निश्चित आहे! येथून जवळच एक मोठे तळे आहे. बाराच वर्षे नाही तर चोवीस वर्षे जरी पाऊस नाही पडला तरी पाणी आटणार नाही. माझ्या पाठीवर बसून येण्यास जे तयार होतील त्यानाच त्या तळ्यात जाता येईल.''

त्या खेकड्याने पाण्यातील सर्व प्राण्यांना ही गोष्ट सांगितली त्याबरोबर सर्व प्राणी ''मला आधी घेऊन जा, मला मला आधी घेऊन जा'' चा घोष करीत बगळ्याकडे येतात.
प्रत्येक प्राण्याला आपल्या पाठीवरून नेऊन बगळा तळ्याजवळच काही अंतरावरील दगडाच्या शिळेवर त्या प्राण्याला आपटून मारी. त्याला खाऊन टाकल्यावर पुन्हा दुसरा मग तिसरा... असा त्या प्राण्यांना खायचा क्रम बगळ्याने लावला.

खेकड्याला आता बगळ्याबद्दल संशय होता. म्हणून तो बगळ्याला विचारतो, ''बगळेकाका, खरं म्हणजे तुमची आणि माझी भेट पहिल्यांदा झाली. पण मला अजून तुम्ही त्या सरोवरात घेऊन गेलेच नाही.''

बगळाही धूर्तपणे विचार करतो, ''रोज तेच तेच खाऊन कंटाळा आलाय. रुचिपलट म्हणून आज खेकड्याला खाऊ.'' बगळा खेकड्याला सांगतो, ''चल तर...बस पाठीवर!''

बगळा त्या नेहमीच्या शिळेजवळ खेकड्याला आणतो. खेकड्याला आजूबाजूला हाडे, काटे आणि मांस पडलेले दिसते. खेकडा बगळ्याला म्हणतो, ''काका...तुम्हीही थकला असाल. इथं विश्रांती घेऊ आणि मग त्या तळ्याकडे जाऊ.''

बगळा आपल्या पाठीवर बसलेला खेडका आपल्या तावडीत अडकलेला बघून खेकड्याला सांगतो, ''अरे मूर्खा...तळे बिळे काही नाही!'' आता तुला विश्रांती देतो माझ्या पोटात. तिकडे तुझे सर्व मित्र भेटतील.

चल घे देवाचं नाव!'' बगळ्याचा दुष्टपणा लक्षात आल्यावर खेकडा आपल्या दोन्ही नांग्यांनी बगळ्याची गोष्ट संपवतो आणि तळ्यावर जाऊन सर्व घडलेली हकीकत सांगतो आणि म्हणतो, ''जे या तळ्यात राहिलेत त्यांच्या आयुष्याची दोरी बळकट म्हणून आपण सर्व वाचलोत ! नशीब तुमचं...मी मध्येच मला न्यायला बगळ्याला सांगितलं! आता मी त्याला ठार मारल्याने आपण सुखाने राहू.''

तात्पर्य : लोभाच्या अतिरेकामुळे प्राण हि गमवावा लागतो.

No comments:

Post a Comment

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();