मराठी नवीन २०२१ jokes मजेदार नवीन Funny Jokes and Mames Photos in Marathi - Marathi goshti

मराठी छान छान गोष्टी लहन मुलांसाठी व मोठ्यांसाठी 30 मजेदार गोष्टी मराठी मधे

February 28, 2021

मराठी नवीन २०२१ jokes मजेदार नवीन Funny Jokes and Mames Photos in Marathi

Jokes In Marathi 2021   

मराठी नवीन २०२१ jokes मजेदार नवीन 

  Best Jokes New in Marathi,

2021 Funny Jokes and Mames Photos in Marathi


प्रियकर: प्रिये तुझी आठवण आली,की तुझा फोटो समोर घेऊनतुला बघत राहतो.
.
.
प्रियसी- मग माझ्या आवाजाची आठवण आली तर काय करतोस ?
.
.
प्रियकर: मग काय एखाद्या कुत्रिला दगड मारतो



 गंप्या एका मुलीला मिनी स्कर्ट मध्ये पाहतो आणि विचारतो तुला आई ओरडत नाही का?

ती मुलगी: हो,

आजच ओरडली, तिचा ड्रेस घातला म्हणून...!!


  
Jokes In Marathi 2021     Best Jokes New in Marathi

संता: अरे खुशखबर! मित्रा मला मुलगी झाली.

बंता: वा! अभिनंदन. अरे, पण आता मुलगी झाल्यावर पंचाईत आहे. मोठेपणी सगळी मुलं तिची छेड काढणार.

मग, तू काय करणार?

संता: त्याची आयडिया आहे माझ्याकडे. म्हणून, माझ्या मुलीचं नाव मी 'ताई' असंच ठेवलंय. 





मुलांना वाढवणं किती विचित्र गोष्ट आहे.
पहिले १२ महिने आपण त्यांना चालायला आणि बोलायला शिकवतो आणि पुढची १२ वर्ष त्यांना एका जागी बसायला आणि चूप राहायला शिकवतो.



Marathi Funny Jokes 2021 College Girls Jokes Marathi

Teacher:अशा माणसाला काय म्हणतात जो कारण नसताना भरमसाट बोलतो.
झम्प्या:Teacher.
लय बदडला झम्प्याला
 




गुरुजी : अकबरचा जन्म आणि मृत्यू कधी झाला?



बंडू : माहीत नाही



गुरुजी : अरे असेकाय करतोस......? पुस्तकामध्ये लिहिले आहे की १५४२ - १६०५

.

.

.

.

.

बंडू : मला वाटले की तो अकबरचा मोबाइल नंबर आहे.






एक मुलगा पाय घसरून गाढवाच्या पायाजवळ

पडतो.

बाजूने एक मुलगी जात

असते.

मुलगी: काय रे, भावाच्या पाया पडतोयस का?

मुलगा: होय, वहिनी!







जेवण झाल्यानंतर...च्या प्रतिक्रीया....

नवरा बायकोला.....



मुंबईकर : थोडी बडीशेप दे ग....

पुणेकर : थोडे icecream दे ग......



सातारकर : काहीतरी sweet दे ग.....



...आणि ..



नागपुरकर: तंबाखुची पुडी दे गं T.V वर ठेवलेली







प्युअर मराठी उखाणा गटारी.....तुका म्हणे जीवा लागलिसी आस ..! मित्र देताहेत पार्टी ऐसा होतसे भास...!!...



मित्राचे उत्तर. ....

तुका म्हणे ऐसा लोभ ना करावा..! मित्राचेच झालेत वांदे..!!आपला बंदोबस्त आपणचं करावा...!!!.... 




2021 Funny Jokes and Mames Photos in Marathi



मी तिला बोललो ....I LOVE U

.

.

.

.

मग ती बोलली, मला BOY FRIEND आहे.



मेने कहा पुराना जायेगा तभी तो नया आएगा

OLX पे बेच दे।..






#जर तुमची Girlfrnd Online असून पण 2 Min च्या आत Reply देत नसेल..

.

.

.

तर..

अभिनंदन भावांनो तुमाला तिने पद्दतशिर घोडा लावलेला आहे असे समजा..... ।।






 'मित्राकडे गेलो होतो गं!' उशीरा घरी आलेला गंपू बायकोला कारण सांगतो.

खरं-खोटं तपासण्यासाठी बायको त्याच्या १० मित्रांना फोन करते.

पाच जण सांगतात, 'हो, आलेला ना इथे!'

तिघे सांगतात, 'हा काय, आत्ताच गेला..'

उरलेले दोघे म्हणतात, 'अहो वहिनी, हा काय इथेच आहे! देऊ का त्याच्याकडे फोन?







(गुरुजींनी वर्गामध्ये एक गंभीर विषय छेडला)

गुरूजी(अतिउत्साहात): मुलांनो, सध्या ‘क्रिकेटचा टी २०’ प्रकार खुपच फॉर्मात आहे. तुमच्या परीक्षा सुद्धा जर ‘टी २०’ सारख्या असल्या तर त्यांचे स्वरूप कसे असेल? कोणाला काही कल्पना?

(पूर्ण वर्ग अचानक शांत झाला. कोणाला काहीच सुचेना)

बऱ्याच वेळानंतर बंड्याने हात वर केला. बंड्या एक व्रात्य आणि खोडकर मुलगा आहे हे पूर्ण वर्गाला माहीत होते.

गुरूजी(नकारात्मक स्वरूपात): हा लवकर सांग काय सांगायचे ते.

बंड्या(गंभीर मुद्रा करून सांगु लागला): गुरूजी परीक्षा १ तास २० मिनिटांची असली पाहीजे

गुरूजी: ठीक आहे, पुढे ?

बंड्या: दर २० मिनिटानंतर विद्यार्थ्यांना आपापसात बोलण्याकरता २ मिनिटाचा ‘टाईम ऑफ’ असला पाहीजे.

गुरूजी(टेंशन मध्ये): बरं पुढे ?

बंड्या: पहिले ३० मिनिटे ‘पॉवर प्ले’ असला पाहिजे, ज्यात शिक्षक वर्गाबाहेर असतील.

(गुरूजींना हल्का हल्का घाम फूटू लागला)

बंड्या: प्रश्नपत्रिकेतील एक प्रश्न ‘फ्री हिट’ असला पाहिजे. विद्यार्थ्यांनी जे काही उत्तर लिहिले असेल त्याला पूर्ण मार्क मिळाले पाहिजेत.

(गुरूजींचे कपडे घामाने ओले झाले)

बंड्या: ...आणि कोणी पुरवणी घेतली की चिअर गर्ल्स नी वर्गात येऊन २ मिनिटे डान्स केला पाहिजे.

(पूर्ण वर्गात टाळ्यांचा कडकडाट झाला आणि विद्यार्थी बंड्या ला खांद्यावर घेऊन नाचू लागले)

गुरूजी कायमचे ‘पॉवर प्ले’ मध्ये (वर्गाबाहेर) गेले...


Marathi Funny Jokes 2021 College Girls Jokes Marathi


(दोन दिवसानंतर शुद्धीवर आलेल्या जखमी भटजीला त्यांचा मित्र भेटायला आला)

मित्र : काय हो, अपघात झाला की काय?

....

भटजी : छे! छे! अपघात वगैरे काही नाही. घरी करवाचौथची पुजा होती. बायको चाळणीतून मला बघत होती. तेव्हा सवयीप्रमाणे गडबडीत बायकोला एवढंच म्हणालो की लवकर आवरा अजुन ३-४ ठिकाणी जायचं आहे. नंतर काय झालं काही कळलंच नाही. आजच शुध्दीवर आलोय.







(नवरा बायकोच भांडण होतं)

बायको: मी चालले घर सोडून तुम्ही एकटेच रहा.

नवरा: मी चाललो देवळात.

बायको: मी परत येणार नाही तुम्ही कितीही नवस केले तरी.

नवरा: अग वेडे मी नवस फेडायला चाललो.



2021 Funny Jokes and Mames Photos in Marathi


(नवरा लग्नाच्या दुसऱ्या दिवशी ब्यूटी पार्लर वालीकडे गेला, जिने त्याच्या बायकोचा मेकअप केला होता)

धन्यवाद! फार छान मेकअप केला होता

म्हणत एक सुंदर iPhone 7 चा बॉक्स दिला.

ब्यूटी पार्लर वाली एकदम खुश झाली व बॉक्स खोलला

आत Nokia 1100 पाहून एकदम चेहराच पाडला

हे काय ?

नवरा हसला व म्हणाला, मला देखील आज सकाळी बायकोला पाहून

असाच धक्का बसला होता.






(पेपरमध्ये प्रश्न होता)

शास्त्रिय कारणे द्या, डोक्यावर पांघरुण घेऊन झोपू नये ?

गण्याने उत्तर लिहिले: “कारण, कोण झोपलय ते कळत नाही.”

मास्तरांनी बदाबदा बदडला...






(भूगोलाचे सर पृथ्वी परिक्रमेबद्दल माहिती देत असतात)

मास्तर: गणेश, सांग पाहू पृथ्वी आणि चंद्रामध्ये काय संबंध आहे ?

गण्या: भावा - बहिणीचा.

मास्तर: काय ?

गण्या: हो गुरूजी, कारण आपण पृथ्वीला माता आणि चंद्राला मामा म्हणतो !



Marathi Funny Jokes 2021 College Girls Jokes Marathi



(मास्तर वर्गात तोंडी परीक्षा घेत असतात)

मास्तर: कावळा सरळ का उडतो ?

गण्या: कारण तो विचार करतो की उगाचच ‘का - वळा’ ?

मास्तर: जर २५ रुपयाला पाव भाजी मिळते तर १०० रुपयाला काय मिळेल ?

गण्या: फुल भाजी.

मास्तर: होटेल मध्ये ठेवलेली झाडे वाढत का नाही ?

गण्या: कारण तिकडे वाढायला वेटर्स असतात ना !

मास्तर: भारत सोडून जाणार्‍या माणसाला काय म्हणाल ?

गण्या: हिंदुस्तान लिव्हर !

मास्तर: हिवाळ्यात खिसेकापूंच्या धंद्यात मंदी का असते ?

गण्या: कारण हिवाळ्यात सर्वांचे हात खिशात असतात.

मास्तर: हत्ती पाण्यात पडला तर काय होईल ?

गण्या: ओला होईल.

मास्तर: जेव्हा घड्याळात तेरा ठोके पडतात ती वेळ कुठली असते ?

गण्या: घड्याळ दुरुस्त करण्याची !

मास्तर: रावणाच्या लंकेला “सोन्याची लंका” का म्हणतात ?

गण्या: कारण लहानपणी रावणाचे आई - वडिल त्याला लाडाने “सोन्या” म्हणायचे.

मास्तर: जर मँगो फ्लेवरचा चहा बनवला तर त्याला काय म्हणाल ?

गण्या: आमटी.

(सगळी उत्तरे ऐकुन मास्तर गायब झाले आहेत)








*Cycle* चालवून थकल्यावर

* Motorcycle * घेतात

*Motorcycle* मुळे पाठ दुखायला लागल्यावर

*Car* घेतात

*Car* चालवून पोट सुटल्यावर

*Gym join* करून तेथे पुन्हा

*Cycle* चालवतात

यालाच म्हणतात

* Life Cycle*



2021 Funny Jokes and Mames Photos in Marathi

1 .घरी पाहुणा आल्यावर पाणी देऊन पंखा लावतो....तो....मुंबईकर

2. घरी आल्यावर पाण्या ऐवजी पाहुण्याला बिअर विचारतो.......तो गोवेकर

3. घरी पाहुणा आल्यावर पाण्या बरोबर गूळ हि देतो....तो सातारकर

4. घरी पाहुणा आल्यावर पाण्या ऐवजी प्रश्न विचारतो तो....पुणेकर

5. घरी पाहुणा आल्यावर पाण्या बरोबर जेवण पण देतो तो सोलापुरकर!!!

6. पाहुण्यांना पाणी, चहा, नाश्ता, जेवण करून गाडीपर्यंत सोडून,पुन्हा नक्की या अस म्हणतो तो मालवणी 

No comments:

Post a Comment

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();