चांगला माणूस आणि दृष्ट माणूस - Kids Story Marathi - Marathi goshti

मराठी छान छान गोष्टी लहन मुलांसाठी व मोठ्यांसाठी 30 मजेदार गोष्टी मराठी मधे

April 8, 2020

चांगला माणूस आणि दृष्ट माणूस - Kids Story Marathi



kids story in marathi

चांगला  माणूस आणि दृष्ट माणूस


        एका गावामध्ये एक मंदिर होते. एक चांगला माणूस असतो तो देवाचा दिवा  व पूजा करण्यासाठी रोज जात असे. हे सर्व तो देव प्रसन्न होण्यासाठी करत असे. पण एक दृष्ट माणूस त्या माणसाने लावलेला दिवा विझवून  टाकत असे. चांगला माणूस पुन्हा दुसर्या दिवशी येतो व दिवा लावून जातो. पुन्हा दृष्ट माणूस येतो आणि दिवा विझवून टाकतो. तिसऱ्या दिवशी असेच होते. असे अनेक दिवस असाच नित्यक्रम चालू असतो .

    चांगल्या माणसाच्या लक्षात येते कि आपण लावलेला दिवा कोणीतरी येवून विझवून जात आहे. मग तो माणूस विचार करतो कि आपण लावलेला दिवा रोज कोणीतरी विझवून टाकत आहे. दिवा लावण्यामध्ये काही अर्थ नाही.

     एक दिवस तो दिवा लावण्यासाठी व पुजा करण्यासाठी मंदिरात जात नाही  पण दृष्ट माणूस त्या दिवशी पण मंदिरात दिवा विझवण्यासाठी येतो पण मंदिरामध्ये दिवा लावलेला नसतो  आणि दृष्ट माणसाला  देव प्रसन्न होतो . कारण तो नित्यनेमाने त्याचे काम करतो .

तात्पर्य  - नित्यनेमेने काम केल्यास फळ मिळते .

No comments:

Post a Comment

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();