दृष्ट मांजर - Marathi Moral Stories - Marathi goshti

मराठी छान छान गोष्टी लहन मुलांसाठी व मोठ्यांसाठी 30 मजेदार गोष्टी मराठी मधे

March 13, 2020

दृष्ट मांजर - Marathi Moral Stories


दृष्ट   मांजर - Marathi Moral Stories

दृष्ट   मांजर - Marathi Moral Stories


          जंगलामध्ये एका झाडावर घार राहत होती. त्याच झाडाच्या खाली मांजर राहत होती. झाडाच्या खाली खोडाजवळ एक डुकरीण तिच्या पिल्लांबरोबर राहत होती. पण त्यांचे कोणाचेच एकमेकांशी पटत नसे. शेजारी असूनही ते एकमेकांशी बोलत नव्हते.

           मांजरीला वाटत होते की, उरलेले दोघे इथून जायला हवे म्हणजे पूर्ण झाडावर मी एकटीच राहीन. ती नेहमी बाकी दोघांना तेथून हटवण्यासाठी उपाय शोधत होती. एक दिवस तिच्या डोक्यामध्ये एक दुष्ट कल्पना आली. मांजराने घारीला बोलवले.

       मांजर घारीला म्हणाली, "हे बघ डुकरीण झाडांची मुळे उकरत आहेत. लवकरच हे झाड पडेल आणि डुकरीण तुझ्या पिल्लांना खाऊन टाकण्याचा प्रयत्न करते .

       घार हे ऐकून खूपच घाबरली. नंतर मांजर डुकरीणीकडे गेली आणि तिला म्हणाली, "तू जेव्हा बाहेर जाशील तेव्हा घार तुझ्या पिल्लांना खाऊन टाकणार आहे. मी तिला तसे म्हणताना ऐकले आहे.'

      डुकरीण पण घाबरली. त्या दोघी घाबरून आपल्या घरातून बाहेर पडल्याच नाहीत. एके दिवशी दोघी भुकेने मारून गेल्या. अशा प्रकारे पूर्ण झाडावर मांजर एकटी राहू लागली. मांजरीने त्या दोघींना आपापसात घाबरूनच मारून टाकले.

तात्पर्य -शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ  

No comments:

Post a Comment

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();