Marathi goshti for kids
कबुतर आणि भांडखोर कोंबडे - Kabutar Ani Bhandkhor Kombade
एके काळची गोष्ट आहे. एक माणूस एका गावात राहत होता. त्याच्याकडे दोन कोंबडे होते. एक दिवस तो बाजारातून येत असताना त्याला एक माणूस कबुतर पक्षी विकत असताना दिसतो. त्याने विचार केला माझ्या मुलांना हा पक्षी खूप आवडेल आणि त्यांना छान वाटेल.
त्याने तो कबुतर पक्षी खरेदी केला आणि आपल्या घरी घेऊन आला. त्याने कबुतर पक्षाला कोंबडयांबरोबर ठेवण्याचा निर्णय घेतला. पण कोंबडे कबुतर पक्षाला त्रास देत असत. कोंबडे त्याच्या मागे मागे जात आणि त्याला आपल्या चोचींनी मारत होते.
एकदा कबुतर पक्ष्याने विचार केला की, हे मला का त्रास देतात. मी यांच्यासाठी नवीन आणि अनोळखी आहे आसे समजून हे माझ्याशी वाईट वागतात.
एक दिवस कबुतर पक्ष्याने पहिले की, ते दोन्ही कोंबडे एकमेकांमध्ये भांडण करत असतात. एकमेकांवर आपल्या चोचींनी वार करत आहे. तेव्हा तो स्वतःशीच म्हंटला की, मला यांच्या वागण्याचे दुख वाटून घेता कामा नये. मला यांच्या वागण्याची तक्रार पण करायला नको.
हे मला चोचींनी मारत आहेत. मी हे पाहू शकतो की, हे एकमेकांमध्ये देखील लढाई करू शकतात. हा तर त्यांचा स्वभावच आहे. आपण इच्छा असूनही कोणाचाही स्वभाव बदलू शकत नाही .
तात्पर्य - जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही
No comments:
Post a Comment