भित्रा व शूर मित्र - Friendship Story in Marathi - Marathi goshti

मराठी छान छान गोष्टी लहन मुलांसाठी व मोठ्यांसाठी 30 मजेदार गोष्टी मराठी मधे

March 20, 2020

भित्रा व शूर मित्र - Friendship Story in Marathi

Friendship Story in marathi with Moral stories short in Marathi 


भित्रा व शूर मित्र - Friendship Story in Marathi

भित्रा व शूर मित्र - Friendship Story in Marathi 


      खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक चोर दोन मित्रांवर हल्ला करतो. त्यातला एक मित्र जीव वाचवण्यासाठी पळून जाऊन लपून बसतो. पण दुसरा शूर मित्र चोराचा मुकाबला करतो आणि त्याला जखमी व निशस्त्र  करतो.

       हे पाहून डरपोक, भित्रा मित्र परत येतो. तिथे जवळ एक लाकूड पडलेलं असते ते लाकूड घेतो आणि चोराला म्हटला 'थांब आता मी तुला माझी बहादुरी दाखवतो. त्याला माहित होते की,चोर आता त्याचे काही नुकसान करू शकत नव्हता. त्यामुळे भित्र्या मित्राने परीस्थितिचा फायदा घेतला. तो चोरासमोर बढाया मारू लागला. शूर मित्र त्याला म्हणला, तू आता शौर्याचे नाटक नको करूस.

       स्वत:ची हातातील लाकूड फेकून दे. तू अशा वागण्याने दुसऱ्यांना मुर्ख बनवू शकतो. मला तुझे खरे रूप कळले आहे. खंर म्हणजे तू येथेच थांबून माझी मदत करायला हवी होती. धीराचे शब्द उच्चारून माझा आत्मविश्वास वाढवायला हवा होता. मी पहिले आहे तू किती भित्रा आहे.

        तू तुझा जीव वाचवून पळून गेलास. कुठल्याही संकटाच्या क्षणी तुझ्या सारख्या माणसावर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही. हे एकूण भित्रा मित्र खाली मान घालून तेथून निघून गेला.

तात्पर्य -विश्वासाला कधी तडा जाऊ देऊ नये

No comments:

Post a Comment

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();