लठ्ठ कोंबडी बारीक कोंबडी - Marathi Goshti For Kids - Marathi goshti

मराठी छान छान गोष्टी लहन मुलांसाठी व मोठ्यांसाठी 30 मजेदार गोष्टी मराठी मधे

January 6, 2020

लठ्ठ कोंबडी बारीक कोंबडी - Marathi Goshti For Kids


लठ्ठ कोंबडी बारीक कोंबडी - Marathi Goshti For Kids

लठ्ठ कोंबडी बारीक कोंबडी


एका मुसलमानाचा घरी एका हाऱ्यात काही कोंबडीं ठेवली होती. त्यातली काही कोंबडीं फार लठ्ठ होती व काही अगदी बारीक होती. जी लठ्ठ होती, ती त्या बारीक कोंबडयांची, त्यांच्या अशक्ततेबद्दल वरचेवर थट्टा करून त्यास हिणवीत असत.

शेवटी, एके दिवशी त्या मुसलमानच्या घरी मेजवानी होती, तेव्हा त्याने आपल्या नोकरास आज्ञा केली की, ‘ह्या कोंबडयांत जी लठ्ठ असतील त्यांस मारून त्यांची कढी करा. ’ त्याप्रमाणे, नोकर जेव्हा त्या लठ्ठ कोंबडयांस ठार मारू लागले तेव्हा ती आपल्या मनात म्हणतात, ‘आम्ही जर त्या दुसऱ्या कोंबडयांसारखी बारीक असतो, तर हा प्रसंग आमच्यावर आज खचित आला नसता. ’

तात्पर्य:- संपत्तीमुळे मनुष्यास गर्व येतो; परंतु जेव्हा लूट होते आणि दरोडे पडतात तेव्हा तीच संपत्ति दुःखास कारण होते.


Naveen Marathi Goshti For Kids



लठ्ठ कोंबडी बारीक कोंबडी - Marathi Goshti For Kids

No comments:

Post a Comment

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();